लैंगिकता : एक संवाद
पालकांनी त्यांच्या मुलांसोबत लैंगिकता शिक्षणासारख्या अवघड वाटणाऱ्या पण महत्वाच्या विषयावर संवाद कसा साधायचा हे शिकवणारी एक विशेष कार्यशाळा !
17 April 2023 | 8:00 PM
|
हि कार्यशाळा कोणासाठी आहे?
नुकतेच वयात आलेल्या आणि असे प्रश्न विचारायला लागलेल्या मुलांचे पालक असोत किंवा किशोरवयात प्रवेश करणार आहेत अशा मुलांचे पालक असोत, हि कार्यशाळा सर्व वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी आहे.
|
हि कार्यशाळा कशाबद्दल आहे ?
वयात येणारी मुलं हा मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा खूप अवघड टप्पा असतो. या वयात मुलांमध्ये शारीरिक आणि भावनिक अनेक मोठे मोठे बदल होत असतात. त्यांना कधीही न पडलेले प्रश्न पडायला लागलेले असतात. त्यातला सर्वात मोठा भाग हा लैंगिकतेने व्यापलेला असतो. पालक म्हणून जेव्हा आपल्याला त्यांच्याशी या विषयावर बोलण्याची वेळ येते तेव्हा अनेक पालकांना दडपण येते आणि ते या विषयावर बोलणे टाळतात पण तसं करून चालणार नाही कारण हा जरी अवघड आणि गुंतागुंतीचा विषय असला तरी आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय आहे. पालकांना या विषयावर आपल्या मुलांशी बोलण्यासाठी योग्य ते ज्ञान आणि टूल्स मिळावे जेणेकरून या संवेदनशील विषयावर मुलांशी संवाद करणे सोपे जाईल या एकमेव हेतूने नेटभेट तर्फे आम्ही पालकांसाठी हि विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे . |
या कार्यशाळेचे फायदे
- आत्मविश्वास वाढवण्यासाठी
तुमच्या मुलाशी लैंगिक संबंधांबद्दल खुले आणि प्रामाणिक संभाषण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने मिळवता येतील जेणेकरून मुलांशी अशा विषयांवर चर्चा करताना तुमचा आत्मविश्वास वाढेल.
- मुलांशी तुमचे नाते मजबूत करण्यासाठी
हि कार्यशाळा एक सुरक्षित जागा तयार करण्यात मदत करेल जिथे तुमचे मूल प्रश्न विचारू शकेल आणि तुमच्याशी संवेदनशील विषयांवर चर्चा करू शकेल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होण्यासाठी मदत होईल.
- तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन
लैंगिक शिक्षण आणि बाल मानसशास्त्र क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन प्राप्त होईल.
या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?
|
मार्गदर्शक - मिथीला दळवी
इंजिनीयर असलेल्या मिथीला या Certified counsellor व Eex Educator म्हणून कार्यरत आहेत.
"अनघड अवघड" नावाची लैंगिकतेसंबंधीत कार्यशाळा ही पालकांसाठी त्या गेली अनेक वर्ष घेत आहेत तसंच मुलांसाठीही अशीच कार्यशाळा त्या "अनकही" या नावाने घेतात. त्यामार्फत लैंगिक शिक्षणासाठी त्या कार्य करीत आहेत. "संवाद - a dialogue" या संस्थेच्या त्या संस्थापिका असून त्या माध्यमातून भावनिक बुद्धिमत्ता अर्थात्, emotional intelligence व sexuality अर्थात लैंगिकता या विषयीच्या कार्यशाळा त्या आयोजित करत असतात. या माध्यमातून हा विषय सोप्या आणि योग्य पद्धतीने पोचावा हाच यामागील उद्देश. |
|
कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?
आमच्या कार्यशाळेमध्ये नोंदणी करणे जलद आणि सोपे आहे.
1️⃣ मेसेज मध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
2️⃣ वेबसाईटवर दिलेल्या "REGISTER NOW" या बटणावर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरा.
3️⃣ आमच्या सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करा.
4️⃣ रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेशन मध्ये सहभागी होण्याचे डिटेल्स ई-मेल आणि व्हॉट्सअॅप द्वारे येतील
1️⃣ मेसेज मध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
2️⃣ वेबसाईटवर दिलेल्या "REGISTER NOW" या बटणावर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरा.
3️⃣ आमच्या सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करा.
4️⃣ रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेशन मध्ये सहभागी होण्याचे डिटेल्स ई-मेल आणि व्हॉट्सअॅप द्वारे येतील
कार्यशाळेबद्दल महत्वाचे प्रश्न
- या कार्यशाळेचा कालावधी किती आहे?
- या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे का ?
- या कार्यशाळेमध्ये वयाची अट आहे का?
- मला Refund हवे असल्यास मिळेल का ?
काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - [email protected]
Whatsapp/Call - 9082205254
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com