सावध तो सुखी
डिजीटल आर्थिक व्यवहारांबाबत साक्षरतेपासून सावधानतेपर्यंत सर्व बाबी शिकवणारी मोफत कार्यशाळा !
Free ! ऑनलाईन ! Live ! मराठीतून !
20 June 2022 । 7.30 PM
Free ! ऑनलाईन ! Live ! मराठीतून !
20 June 2022 । 7.30 PM
डिजिटल माध्यमातून सुरळीत आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याविषयाची पूर्ण व योग्य माहिती असणे अलिकडच्या काळात अत्यावश्यक झालेले आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसागणिक ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटना !
आपण अशा घटनांना बळी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काय सावधानता बाळगावी, तसेच काय तत्परता दाखवावी, आपली माहिती गोपनीय ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे सर्व काही शिकणे फार गरजेचे झाले आहे. त्यामुळेच नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सतर्फे घेऊन येत आहोत, मा.श्री.चंद्रशेखर ठाकूर यांची 'सावध तो सुखी' ही मोफत कार्यशाळा. ही कार्यशाळा कोणासाठी ? - डिजीटल आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी - फसवणूक झालेल्यांसाठी - नव्याने डिजीटल आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी - महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी वा अन्य कोणीही प्रमुख वैशिष्ट्य 1.ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन 2. तज्ज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी 3. स्लाईड शोच्या माध्यमातून सोप्या भाषेत शिका. |
डिजीटल आर्थिक फसवणूक, फसवे मेसेजेस, बनावट फोनकॉल्स, ईमेल, एटीएम वा डेबिट कार्ड वा क्रेडीट कार्डद्वारे होणारी फसवणूक, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना होणाऱ्या गफलती या सर्व मुद्द्यांचा सर्वंकष विचार करून हे सर्व कसे टाळता येऊ शकते हे शिकण्यासाठी या कार्यशाळेत जरूर सहभागी व्हा !
|
मार्गदर्शकचंद्रशेखर ठाकूर- गेली 52 वर्षे मुंबई शेअर बाजारात कार्यरत. पैकी 33 वर्षे बीएसई (Bombay Stock Exchange) आणि 19 वर्षी सीडीएसएल मध्ये कार्य.
- आर्थिक साक्षरता प्रसार, प्रबोधन करण्यासाठी स्लाईड शोच्या माध्यमातून 1,700 हून अधिक व्याख्याने/कार्यक्रम देशभरात केलेले आहेत. - विविध नामांकित वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने लिखाण, स्तंभलेखन. - आकाशवाणी मुंबई, सांगली, औरंगाबाद केंद्रावरून 21 डायल इन कार्यक्रम. - सन 2006 सालचा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा “अर्थवेध” पुरस्कार. - महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी 25 व्याख्यानांचे आयोजन. - डिजीटल म्हणजेच रोखीविना व्यवहार कसे करावेत हे सोप्या शब्दात समजावून देणाऱ्या 'भीमरूपी महामुद्रा' कार्यक्रमाची निर्मिती करून या कार्यक्रमाचे 142 वेळा सादरीकरण. - केवळ शहरी भागात नव्हे तर खेड्यांमध्येही जाऊन आर्थिक प्रबोधनाचे कार्य. - महाराष्ट्र टाईम्स बरोबर 20, लोकसत्ता बरोबर 30, सकाळ दैनिकाबरोबर 140 कार्यक्रमांसह अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ICAI, वृत्तपत्रे, बँक्स, रोटरी क्लब, महाविद्यालयांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांमध्येही याच विषयावर मार्गदर्शनाद्वारे प्रबोधनाचे कार्य. |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |