पालक असणे, मुलांचे संगोपन करणे, त्यांना वाढवणे हा आनंददायी पण तितकाच आव्हानात्मक अनुभव आहे. पालकत्व ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात स्वतंत्रपणे जगण्यासाठी तयार करते. जसजशी मुलं वाढतात, मोठी होतात तसतसे आपल्या मुलांच्या निरोगी आणि आनंदी भविष्यासाठी मदत करतील अशा अनेक गोष्टी आपण पालक म्हणून करू शकतो. म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत आपल्या मुलांना निरोगी आणि आनंदी वातावरणात कसे वाढवायचे यावर पालकांना प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून उचित मार्गदर्शन करणाऱ्या पाच ऑनलाईन (Pre-Recorded) कोर्सेस चा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून ! |
|
या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -
Course 1 -
मुलांचे मोबाईल व्यसन कसे हाताळावे. (Smartphone Addiction in Children) स्मार्टफोन आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. इतका की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाचंही स्मार्टफोन शिवाय पानही हलत नाही. मात्र या उपयोगी उपकरणाचं हळूहळू व्यसनही लागत आहे आणि प्रामुख्याने आपल्या लहान मुलांवर याचा परिणाम होत आहे. सतत ऑनलाईन राहणे, व्हिडिओ पाहणे, ऑनलाईन गेम्स यांच्या आहारी गेल्याने मुलांचं सर्वाधिक नुकसान होत आहे. मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ, अभ्यास, शैक्षणिक प्रगती, सामाजिक कौशल्ये या सर्वांवर गंभीर परिणाम मोबाईल मुळे होत आहेत. या प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून मुलांचे मोबाईल व्यसन कसे हाताळावे ? या विषयावर मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ मोबाईल वापराचा मुलांवरील परिणाम ✅ अतिवापरामुळे होणारा वागणुकीतील बदल आणि त्याची लक्षणे ✅ मोबाईलचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी मुलांना कसे तयार करावे ? ✅ मुलांना स्वनियंत्रण कसे शिकवावे? ✅ मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे कसे बनवावे ? |
Course 2 -
मुलांशी न रागावता कसं बोलायचं ? (How To Talk To Children Without Getting Angry) आपल्या मुलावर ओरडणे, त्यांच्याशी बोलताना ताबा सुटणे, आवाज वाढवणे…. जवळजवळ प्रत्येक पालक हे कधी ना कधी करतच असतात. परंतु आपण हे विसरून जातो कि मुलं आपल्याकडून संवाद कसा साधायचा हे शिकत असतात. लहान वयात मुलं जेव्हा त्यांच्यात जोमाने विकास होत असतो तेव्हा पालकच त्यांच्या अनुकरणाचा पहिला गुरु असतात त्यामुळे आपण त्त्यांच्यांशी कसं वागतो, बोलतो यावर त्यांच्या मनावर होणारे संस्कार अवलंबून असतात. रागावलो नाही तर मुलांना योग्य वळण लागणार कसं ? असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल. या प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ आपल्या रागावून बोलण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतो ? ✅ मुलांशी संवाद साधताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा ? ✅ न रागावत मुलांना शिस्त कशी लावावी ? ✅ मुलांना स्वनियंत्रण कसे शिकवावे? ✅ मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे कसे बनवावे ? |
Course 3 -
आपल्या मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पालकांना काय करता येईल? (Intellectual Growth of Children and Parenting) मुलांची बौद्धिक वाढ हि शाळा आणि शिक्षक यांवर जास्त अवलंबून असते असे अनेक पालकांना वाटते. शैक्षणिक कौशल्ये आणि ज्ञान या गोष्टी मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी जरी आवश्यक असल्या तरी इतरही अनेक गोष्टी आहेत जे पालक म्हणून आपल्या हातात असतात. उदा. आत्ताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपली मुलं जे ज्ञान आत्मसात करत आहेत ते त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी पूरक आहे कि मारक याकडे पालक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे. या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ मुलांची बौद्धिक वाढ नेमकी कशी होते? ✅मुलांची बौद्धिक वाढ आणि पालकत्व यातील संबंध ✅मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पालक कशी मदत करू शकतात? ✅मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ✅हसत खेळत मुलांच्या बौद्धिक वाढीला चालना कशी द्याल |
Course 4 -
मुलांशी प्रभावीपणे संवाद कसा साधावा? (Effective Communication With Childern) पालक आणि मूल यांच्यातील संवाद अनेक कारणांमुळे कठीण होऊ शकतो. दैनंदिन जीवनातील धावपळ, प्रत्येक मुलाचे वेगवेगळे विकासाचे टप्पे आणि कुटुंबातील व्यक्तींचे वैविध्यपूर्ण स्वभाव, हे सर्व घरामध्ये संवाद साधण्याच्या पद्धतीला हातभार लावतात. मुलांच्या मानसिक आणि भावनिक सुदृढतेसाठी पालक आणि मूल यांच्यामध्ये सकारात्मक संवाद असणे फार गरजेचे असते. पण नेहमी होणारे हे संवाद कोणत्याही क्षणी बिघडू शकतात आणि बर्याचदा, पालकांना असे वाटते की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते त्यांच्या मुलांपर्यंत आपले विचार, काळजी पोहोचवू शकत नाहीत. तुम्हालाही असं वाटत का किंवा तुम्हाला भविष्यात कधी तुमच्या मुलांशी होणाऱ्या संवादांची चिंता टाळायची आहे का ? या प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स 👉 या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल - ✅ मुलांशी संवाद साधताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा ? ✅ काही वरवर सकारात्मक वाटणाऱ्या संवादाच्या पद्धती प्रत्यक्षात किती हानिकारक आहेत ✅ काही पर्यायी आणि प्रभावी संवादाच्या टेक्निक्स ✅ आपल्या मुलांशी संवाद आणि नातेसंबंध कसे वाढवायचे याची उदाहरणे. ✅ किशोरवयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि कोणती काळजी घ्यावी |
Course 5-
मुलांना शिस्त लावण्याची योग्य पद्धत (Positive Discipline Techniques) मुलांना योग्य ती शिस्त लावणं हा पालकत्वातील सर्वात महत्वाचा आणि तितकाच अवघड भाग आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना योग्य वेळी, योग्य ते वळण आणि शिस्त लावायची तर असते पण हे करत असताना आपले आपल्या मुलांशी असलेले नाते तर दुरावणार नाही ना, आपल्या बोलण्याचा त्यांच्यावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची सुद्धा काळजी असते. त्यामुळे आपल्या मुलांना सकारात्मक पद्धतीने त्यांच्यावर कोणतीही आरडाओरड किंवा चिडचिड न करता शिस्त कशी लावायची ? असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. या प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ मुलांना शिस्त लावताना कोणती काळजी घ्यावी ? ✅ मुलांना शिस्त लावण्याच्या काही सकारात्मक पध्द्ती आणि टेक्निक्स ✅ आपल्या दैनंदिन संवादामध्ये मुलांवर कोणताही ताण न येऊ देता शिस्त कशी लावावी ? ✅ आपल्या मुलांशी संवाद आणि मैत्रिपूर्ण नातेसंबंध कसे वाढवायचे याची उदाहरणे. ✅ किशोरवयीन मुलांमध्ये शिस्त लावताना कोणती काळजी घ्यावी |
Special offer price !
|
काही महत्वाचे प्रश्न
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत.
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत.
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता.
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता.
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा.
5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे.
Trainer - Dr. shruti panseशिक्षणतज्ञ, लेखक, वक्ता, संशोधक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांनी ‘ब्रेन-बेस्ड लर्निंग’(मेंदू आधारित शिक्षण) या विषयामध्ये एसएनडीटी विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळविली आहे. वेगवेगळ्या एनजीओज, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि मानसोपचारतज्ञांसाठी उपयुक्त असणारे टॉक-शो किंवा चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो. याशिवाय आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करतात.
त्या मुले आणि पालक यांचे समुपदेशनही करतात आणि त्यांनी आतापर्यंत या संदर्भात 250 हून अधिक कार्यशाळाही घेतल्या आहेत. अभ्यासाची तंत्रे, मुलांशी कसे वागावे, त्याच्या वर्तनातील समस्या कशा हाताळाव्यात, शिकण्यातील अडचणी, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे वर्तनावर होणारे परिणाम याबाबत त्या मार्गदर्शन करतात. |