Day 3 (28 May) Session is cancelled !
FOR MORE INFORMATION WHATSAPP - 99309 36050
नमस्कार,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या माध्यमातून आम्ही आपणासाठी एक अनोखी भेट घेऊन आहोत ! नेटभेट परिवारातील सर्व नृत्यप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, तीन दिवसांची जबरदस्त "कथ्थक नृत्य कार्यशाळा !" मोफत ! ऑनलाईन ! मराठी ! Live ! या कार्यशाळेत रचना डान्स अकॅडेमी (पुणे) तर्फे आर्या जावडेकर आपल्याला कथ्थक नृत्यपरंपरेशी ओळख करून देतील. प्रसिद्ध नृत्यांगना आणि प्रशिक्षक श्रीमती राजश्री जावडेकर यांच्या त्या शिष्या आणि कन्या आहेत. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत कथ्थक नृत्यामधील काही महत्वाच्या मुद्रा, पदलालित्य, कथ्थक नृत्याचे तंत्र इत्यादी गोष्टी शिकता येतील. तसेच व्यावसायिक श्रेणीचे कथ्थक नृत्य कलाकार होण्यासाठी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे याचे देखील मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येईल. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कथ्थक नृत्याविषयी जाणून घ्यायचे असेल आणि या क्षेत्रात सुरुवात करायची असेल तर नेटभेट प्रस्तुत या कार्यशाळेत अवश्य सहभागी व्हा ! दिनांक 26 to 28 May 2021 सायंकाळी 7:30 वाजता आजच रजिस्ट्रेशन करून या विनामूल्य कार्यशाळेत आपली जागा राखून ठेवा ! आणि हा मेसेज आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका !
धन्यवाद ! टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! |