​विचार कौशल्य वाढवा आणि तुमची उद्दिष्टे गाठा !
Power Of Thinking
आपल्या विचारांमध्ये आपले आयुष्य बदलण्याची ताकद असते हि ताकद आपल्या हितासाठी कशी वापरता येईल ? 
हे शिकूया ! सोप्या मराठी भाषेतून !
​​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
असं म्हटलं जात आपण आपल्या विचारांच प्रतिरुप आहोत. आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असते. विचार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे म्हणण्यापेक्षा हि एक गरज आहे जिची आवश्यकता आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी,  प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी लागतेच. नवीन कौशल्य शिकण्यासाठी, लहानमोठे निर्णय घेण्यासाठी, आपलं मत तयार करण्यासाठी किंवा मग एखादी कल्पना करण्यासाठी विचार हा करावाच लागतो.

शिवाय प्रत्येक परिस्थितीमध्ये सारखाच विचार करून चालत नाही परिस्थितीनुसार विचार करण्याची पध्द्त सुद्धा बदलावी लागते. हे सर्व असूनही, विचार करणे किंवा योग्य पध्द्तीने विचार करणे आपल्याला जमते का? हा प्रश्नच आहे. 

म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत विचार कसा करावा, परिस्थितीनुसार कोणत्या पद्धतीने विचार करावा हे शिकवणारा चार ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
Picture
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY


​या कोर्सचे मुख्य फायदे

Picture
✅ आपल्या विचारांमध्ये असलेली ताकद समजून घेण्यास मदत होईल. 

✅ करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगतीसाठी Strategic Thinking चे महत्व 

✅ कोणतीही समस्या सोडवण्यासाठी विचार कसे मदत करू शकतात हे शिकता येईल. 

✅ यशस्वी लोकं आणि सामान्य माणूस यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत नेमका फरक काय आहे हे समजून घेता येईल. 

✅ समस्या सोडवण्यासाठी, नवीन पद्धतीने संवाद साधण्यासाठी,  नवीन मार्ग शोधण्यासाठी आपल्या विचारांची भूमिका समजून घेता येईल. 

✅ आपल्या विचारांतील नकारात्मकता साकारात्मकतेत बदलण्यासाठी
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
यशस्वी लोक कसा विचार करतात?/How Successful People Think ?
जगात खर्‍या अर्थानं यशस्वी म्हणता येतील अशी लोकं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. आणि ही यादी बघितली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व लोक जन्मताच इतके यशस्वी नव्हते, तर खुप खडतर प्रवासानंतर ते तिथे पोहचू शकले आहेत. प्रयत्न, जिद्द, चिकाटी यांबरोबर जी एक गोष्ट त्यांना सामान्या मधून असामान्य बनवते ती म्हणजे त्यांची विचार करण्याची पध्दत. या कोर्समध्ये आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.
​
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ विचार करण्याची पद्धत बदलणे का आवश्यक आहे ?
✅ यशस्वी लोकांच्या विचार करण्याच्या ११ विविध पध्दती
✅ यशस्वी लोकं आणि सामान्य माणूस यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत नेमका फरक काय आहे?


Picture
Course 2 -
विचारांमध्ये स्पष्टता कशी आणावी ते शिकूया! / Learning how to Think Clearly
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य आणि स्पष्ट विचार करण्याचे मूल्य ठरवणे जरा कठीणच आहे. ज्यांनी याच महत्व ओळखलंय आणि हे एक कौशल्य आहे जे आपण शिकू शकतो हे  ज्यांच्या लक्षात आलंय ते स्वतःचा विकास करण्याच्या दिशेने एक पायरी आधीच चढले आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हे  एक महत्वाचे कौशल्य आहे जे आपल्याकडे असलेच पाहिजे. 

मात्र तरीही आपण योग्य आणि स्पष्ट विचार करण्याचे कौशल्य आवर्जून शिकण्याचा प्रयत्न सहसा करत नाही. आणि आपल्याला शाळा कॉलेजात देखील हा विषय शिकविला जात नाही. या कोर्समध्ये आपण हेच कौशल्य शिकणार आहोत. 

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ विचार म्हणजे काय ?
✅ विचारांची प्रक्रिया
✅ सुस्पष्ट विचार करण्याच्या काही पद्धती
✅ विचार करताना होणाऱ्या हमखास चुका
✅ विचारप्रक्रियेमागील विज्ञान
✅ मेंदूला योग्य विचारांसाठी पुरवायचे इंधन

Picture
Course 3 -
धोरणात्मक विचार कसे करावे?/Strategic Thinking 
Strategic Thinking (धोरणात्मक विचार) म्हणजे मोठ्या पातळीवर विचार करणे आणि सोबत सूक्ष्म बाबींचाही विचार करणे, दीर्घ कालाचा आणि सोबत आजचा विचार करणे, भूतकाळातुन धडा घेऊन भविष्याचा वेध घेणे.

 कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये Strategic thinking हे अत्यावश्यक स्किल आहे. आणि जसजसे आपण करिअर मध्ये पुढे जाणार तसे हे अतिमहत्त्वाचे स्किल बनत जाते.प्रमोशन होणे, बदली व बढती मिळणे, पगारवाढ या सर्व गोष्टी  Strategic thinking शिवाय कठीण होत जातात. या कोर्समध्ये आपण हेच कौशल्य शिकणार आहोत. 

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ कठीण समस्यांवर उपाय शोधण्यासाठी,
✅ आपल्या टीममधील सहकार्यांना मार्गदर्शन देण्यासाठी,
✅ करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगतीसाठी
✅ उपयुक्त ठरणारे Strategic Thinking हे स्किल कसे आत्मसात करावे !

Picture
Course 4 -
विचारांमध्ये कल्पकता कशी आणावी हे शिकूया !/Creative Thinking
क्रिएटिव्ह विचार करणे म्हणजे गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता. क्रिएटिव्ह विचार करण्याचे कौशल्य हे केवळ कलाकार किंवा संगीतकार यांसारख्या लोकांसाठी फायदेशीर आहे असे नाही तर हे कौशल्य प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. 

स्वतःच्या मनाला कल्पकतेने विचार करण्यासाठी प्रशिक्षित करणे आपल्याला नवीन शोध लावण्यासाठी ,समस्या सोडवण्यासाठी, नवीन पद्धतीने संवाद साधण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यासाठी मदत करते. कल्पकतेला जॉब मार्केट मध्ये जास्त मागणी आहे आणि World Economic Forum च्या अलीकडील अहवालानुसार भविष्यातील नोकऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या प्रमुख कौशल्यांपैकी एक कौशल्य आहे. असे हे सर्व दृष्टीने महत्वाचे कौशल्य कसे मिळवायचे हेच आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ Creative Thinking म्हणजे काय ?
✅ कल्पकतेने विचार करण्याचे फायदे
✅ Creative Thinking सुधारण्याच्या टेक्निक्स
✅ समस्या सोडवण्यासाठी या कौशल्याचा कसा वापर होतो
✅ या विचारप्रक्रियेमागील विज्ञान

Special offer price !

₹499/- + GST ONLY
​
ONE YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !
​

​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 

2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा admin@netbhet.com या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 

3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 

4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा. 

5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

Salil chaudhary

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Link Page
  • Knee