GOOGLE TOOLS EXPERT

गुगल चे बरेचसे टूल्स आपण आपल्या मोबाईल मध्ये, कंप्युटर मध्ये नेहमी पाहतो त्यातले काही सर्रास वापरतो
पण त्यांचा स्मार्ट वापर कसा करायचा हे फक्त इथेच शिकायला मिळेल !
सोप्या मराठीतून !​
​
​Book Now @₹ 499 /- + GST Only
नमस्कार मित्रांनो,

गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अ‍ॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही.

म्हणूनच आम्ही  नेटभेट तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... Google Tools Expert !....गुगलच्या या विविध उपयुक्त अप्लिकेशन्स आणि टूल्स च्या वापराबद्दल सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारा अकरा ऑनलाईन कोर्सचा संच ! आपल्याला समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
Picture
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY


​या कोर्सचे मुख्य फायदे

Picture
✅ गुगल च्या विविध उपयुक्त टूल्स बद्दल एकाच ठिकाणी आणि सोप्या मराठी भाषेतून शिकण्याची संधी 

✅ आपण नेहमी वापरात असलेल्या गूगल टूल्स चे काही ऍडव्हान्स फीचर्स शिकून आपल्याला गूगल चे स्मार्ट युझर बनता येईल.  

✅  प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी मदत होईल.

✅ आपल्याला पाहिजे असलेली माहिती जास्त वेळ खर्च ना करता गुगल वरती शोधण्यासाठी 

✅ सुंदर प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी, कॅलक्युलेशन्स साठी, आपल्या वेळेचं नियोजन करण्यासाठी, सर्वे करण्यासाठी, नोट्स घेण्यासाठी गुगल च्या कोणत्या टूल्स चा आणि कसा वापर करावा याबद्दल सविस्तर माहिती
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

या संचामध्ये खालील GOOGLE TOOLS चा समावेश आहे -

Picture
Tool 1 -
Google Search Power Features
माहिती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शक्ती. ही माहिती शोधण्यासाठी Google हे सध्याचे वेबवरील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आपल्यापैकी बरेच जण माहिती शोधण्यासाठी गुगल सर्चवर अवलंबून आहेत. बरेचवेळा Google आपण शोधत असलेल्या माहितीसाठी शेकडो किंवा हजारो रिझल्ट्स आपल्याला उपलब्ध करून देते आणि त्यामुळे आपण प्रत्यक्षात शोधत असलेली योग्य माहिती शोधणे कठीण वाटते. दररोज Google वापरत असूनही, आपण याचा फारच बेसिक वापर करत आहोत.

पण तुम्हाला माहित आहे का, Google च्या सर्च इंजिन मध्ये अनेक शक्तिशाली आणि विशेष फीचर्स आहेत, ज्यांचा वापर करून आपण Google वर कमीत कमी वेळात अचूक माहिती शोधू शकतो. Google सर्च ची ही ऍडव्हान्स वैशिष्ट्ये आपल्याला गुगल सर्च चा अधिक चांगला आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मदत करतात.
Picture
Tool 2 - 
GMAIL Power Features
जरी Gmail चा वापर आपण सर्रास करत असलो तरीही Gmail ची अशी अनेक फिचर्स आहेत जी आपल्याला अजूनही माहीत नाही आणि त्यामुळे आपला बहुतांश वेळ नेहमी ईमेलचे नियोजन करण्यात जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ईमेल मध्ये आपण घालवलेल्या वेळेपैकी ७०% वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो. ते कसं? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत. 

Picture
Tool 3 -
​Google Drive
गुगलवरून माहिती मिळवण्यात आपण एक्सपर्ट तर झालोच पण मिळालेली माहिती सेव्ह करण्यासाठी, त्याचं स्टोरेज असलेलं माध्यम म्हणजे गुगल ड्राईव्ह ज्याची आपल्याला खास माहिती नसते. इतकंच नव्हे तर विविध ऑनलाईन स्पर्धा, ऑनलाईन एज्युकेशन घेतानाही आपल्याला या गुगल ड्राईव्हची फार फार मदत होते. आपले व्हिडीओज शेअर करण्यासाठी, मोठ्या मोठ्या वर्क फाईल्स एकमेकांशी शेअर करण्यासाठी गुगल ड्राईव्ह चटकन मदतीला हजर होतो. 

Google Drive चा जास्तीत जास्त वापर आपण कसा करू शकतो ? कुठे कुठे करू शकतो ? या साऱ्याविषयी माहिती या कोर्समध्ये सोप्या मराठी भाषेतून शिकणार आहोत. 


Picture
Tool 4 -
​Google Sheets
​काही वर्षांपूर्वी गुगलने मायक्रोसोफ्ट एक्सेल ला टक्कर देणारे गूगल शीट हे सॉफ्टवेअर बनवले.Google Sheets हे ब्राउझर मध्ये वापराता येत असल्याने कंप्युटर स्टोरेज सुद्धा वापरले जात नाही. Google Sheets मध्ये एक्सेल मध्ये दिले जाणारे फीचर्स आहेतच शिवाय त्यामध्ये काही असे फीचर्स सुद्धा आहे जे एक्सेल मध्ये नाहीत ज्यामुळे मोठ्या डेटा वर काम करणं सोपं होतं. 

असं हे Google चं  टूल आपण कसं वापरू शकतो ? कुठे कुठे वापरू शकतो ? त्यामधले वेगवेगळे फीचर्स वापरून आपण आपलं काम अधिक सोपं कसं करू शकतो ? या साऱ्याविषयी माहिती या कोर्समध्ये सोप्या मराठी भाषेतून शिकणार आहोत.



Picture
Tool 5 -
Google Sheets - Formulas And Functions
Google Sheets हे सॉफ्टवेअर फक्त एका भागामध्ये संपूर्ण जाणून घेणे सोपे नाही यामध्ये असे अनेक Formulas आणि  Functions आहेत ज्यामुळे कितीही मोठ्या डेटा वरती काम करणं तर सोपं होईलच शिवाय यामध्ये असे काही Functions सुद्धा आहेत ज्यामुळे आपण इतर सॉफ्टवेअर्स  Google Sheets ला कनेक्ट करू शकतो. 

ते Formulas आणि  Functions कोणते आहेत? त्यांचा वापर आपण कुठे कुठे आणि कसा करू शकतो?  या साऱ्याविषयी माहिती या कोर्समध्ये सोप्या मराठी भाषेतून शिकणार आहोत. 

Picture
Tool 6 -
Google Docs
​Google डॉक्स हे Google चे ब्राउझर-बेस वर्ड प्रोसेसर आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डसाठी हा एक मोफत पर्याय आहे. यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स ऑनलाइन बनावता येतात, एडिट करता येतात आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करता येतात. 

असं हे Google चं  Free टूल आपण कसं वापरू शकतो ? त्याची विविध वैशिष्ट्ये कोणती आहेत ? या साऱ्याविषयी माहिती या कोर्समध्ये सोप्या मराठी भाषेतून शिकणार आहोत.


Picture
Tool 7 -
Google Slides

​प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी आपण सगळेचजण आजवर पॉवर पॉईंटचा वापर अगदी सहजतेने व प्राधान्याने करत आलेलो आहोत. पण गुगलने सुद्धा हिच सुविधा Google Slides च्या माध्यमातून आपल्याला मोफत उपलब्ध करून दिली आहे हे अनेकांना माहित नसेल आणि माहित असल तरी त्याच्या वापराबद्दल अजूनही अनेक प्रश्न मनात असतील.

Google Slides साठी कोणत्याही सॉफ्टवेअर ची आवश्यकता नाही, हे ब्राउझर मध्ये वापराता येत असल्याने कंप्युटर स्टोरेज सुद्धा वापरले जात नाही. असं हे Google चं  टूल आपण कसं वापरू शकतो ? सुंदर प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपण त्याचा कसा वापर करू शकतो ? या साऱ्याविषयी माहिती या कोर्समध्ये सोप्या मराठी भाषेतून शिकणार आहोत.
 

Picture
Tool 8 -
Google Calendar
या कोर्स मध्ये आपण  Google Calendar या  Scheduling टूल बद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला आपलं गुंतागुंतीच शेड्युल सोपं आणि योग्य प्रकारे प्लॅन करण्यासाठी आणि Reminder सेट करण्यासाठी मदत करेल. या व्यतिरिक्त यांचे विविध फिचर्स कोणते आहेत आणि त्यांचा आपण आपल्या वैयक्तिक कामांबरोबरच व्यावसायिक कामांसाठी सुध्दा कसा वापर करून घेऊ शकतो हे सविस्तर शिकणार आहोत.

Picture
Tool 9 -
Google Form
​गुगल फॉर्म्स हे टूल वापरून इंटरनेट वरून आपण कोणाकडूनही एखादी माहिती गोळा करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ सर्वे फॉर्म्स,फीडबॅक फॉर्म्स, इंटरनेट मार्केटिंग द्वारे कस्टमर लीड्स सुद्धा मिळवू शकतो… इतकेच नव्हे तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टेस्ट देखील घेऊ शकतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स गुगल फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे अतिशय साधं, सोपं आणि उपयुक्त असणारं हे टूल मोफत आहे. आपण याच टूल बद्दल या कोर्समध्ये सविस्तर शिकणार आहोत.

Picture
Tool 10 -
Google Keep
या कोर्स मध्ये आपण Google Keep या टूल बद्दल जाणून घेणार आहोत जे एक Note taking अ‍ॅप आहे. यामध्ये आपण नोट्स लिहू शकतो,रिमाइंडर सेट करू शकतो,लिस्ट बनवू शकतो. याव्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. सततच्या धावपळीच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हे एक अत्यंत उपयुक्त अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप इतके उपयुक्त आहे कि अनेक बिझी लोकं, उद्योजकांना,प्रोफेशनल्सना याचा फायदा होईल.
Picture
Tool 11 -
Google Sites
Google Sites हा WordPress किंवा Wix सारखा Google चा वेबसाइट-बिल्डिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म च्या मदतीने आपण विविध माहिती एकत्र करून वेबसाइट बनवू शकतो. Google Sites ने आपल्या गरजांना अनुसरून वापरता येतील अशा अनेक टेम्प्लेट्स सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे इथे आपण गुगल अकाउंट च्या माध्यमातून इतरांशी कोलॅबरेट करून एकत्रित वेबसाईट बनवू शकतो. बनवलेली वेबसाईट आपण आपल्या सोयीप्रमाणे प्रायवेट किंवा पब्लिक करू शकतो. याच Tool बद्दल या कोर्समध्ये सविस्तर शिकणार आहोत.

Special offer price !

₹499/- + GST ONLY
​
One time fee lifetime access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​Buy NOW @₹ 499 /- + GST ONLY
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

TOOLs explained by

Salil chaudhary

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge