भावनिक बुद्धीमत्ता वाढवा.... आयुष्य सुंदर बनवा !
आपल्या भावनांचे योग्य व्यवस्थापन एक कौशल्य आहे जे आपण प्रयत्नांनी विकसित करु शकतो. ते कसे करावे ? हे शिकूया !
सोप्या मराठी भाषेतून !
सोप्या मराठी भाषेतून !
आपले विचार हे बऱ्याचअंशी आपल्या भावनांवर अवलंबून असतात हे एक वैज्ञानिक सत्य आहे. जेव्हा कोणतीही भावना (आनंद, दुःख, राग) अनावर होते तेव्हा ती आपल्या मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेत बदल घडवून आणते. यामुळे आपली विचार करण्याची, निर्णय घेण्याची, इतरांशी संवाद साधण्याची क्षमता कमी होते. आपल्या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक यशस्वी होण्यास मदत करते. म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत आपल्या भावनांना समजून आपली भावनिक बुध्दीमत्ता वाढवण्यासाठी योग्य प्रकारे भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवणारा या तीन ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून ! |
|
✅ आपल्या भावना अधिक योग्य प्रकारे समजून घेण्यास आणि त्यावर काम करण्यास मदत होईल.
✅ रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. ✅ भावनांचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करून द्यायचा हे शिकता येईल. ✅ स्व-संवाद आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेता येईल. ✅ स्वतःला काय वाटते आहे हे ओळखण्याची आणि आपल्या भावना आणि कृतींचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची क्षमता. ✅ भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला इतरांना काय वाटत असेल ते समजून घेण्यास सक्षम बनवते आणि दयाळूपणे आणि विचारपूर्वक प्रतिसाद देण्यास मदत करते. |
Course 1 -
Control Your Emotions, Control Your Life माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, जो असंख्य भावना अनुभवू शकतो. आनंद, आशा, दु: ख, भीती, राग, निराशा - या काही भावना आहेत ज्यामुळे आपल्याला जीवनाचा पूर्ण अनुभव घेता येतो. भावना अनुभवण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता ही आपल्याला वाटते त्यापेक्षाही खुप महत्त्वाची आहे.
परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते, पण त्यावरची आपली प्रतिक्रीया पूर्णपणे आपल्या हातामध्ये असते. आपल्या भावनांचे योग्य व्यवस्थापन एक कौशल्य आहे जे आपण प्रयत्नांनी विकसित करु शकतो. ते कसे करावे ? हे आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ Emotional Intelligence म्हणजे काय ? ✅ भावना एखाद्याच्या आयुष्यात नक्की कशाप्रकारे काम करतात ✅ भावनांचे व्यवस्थापन कसे करावे ? ✅ भावनांना हाताळताना कोणत्या चुका करू नये ? ✅ Pawerful emotional Control strategy |
Course 2 -
Anger Management राग ही एक सामान्य आणि अगदी निरोगी भावना आहे. परंतु त्यास सकारात्मक पद्धतीने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. अनियंत्रित राग तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर परिणाम करू शकतो.
राग आटोक्यात आणणे म्हणजे कधीही राग येऊच न देणे असे नाही. ते आपल्या हातातही नसते त्याऐवजी, आपला राग कसा ओळखायचा, त्याचा सामना कसा करायचा आणि निरोगी आणि प्रोडक्टिव्ह मार्गांनी कसा व्यक्त करायचा हे शिकणे गरजेचे आहे. राग व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे जे प्रत्येकजण शिकू शकतो. माझा राग नियंत्रणात आहे असे जरी तुम्हाला वाटत असले तरीही, सुधारण्यासाठी नेहमीच जागा असते. हेच कौशल्य आपण या कोर्स मध्ये पाहणार आहोत. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ राग म्हणजे काय ✅ ही भावना नक्की काय आहे आणि ती आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करते हे समजून घेणे ✅ यावर उपाय काय ✅ रागाचे व्यवस्थापन कसे करावे |
Course 3 -
How To Improve Self-Talk आपण आपल्या मनाशी बोलतो आणि बरेचदा आपल्या त्या संवादात नकारात्मकताच अधिक असते हे कधी तुम्हाला जाणवलंय का ?
आपल्या मनात आपण स्वतःशी करत असलेला संवाद हा नेमका कसा असावा जेणेकरून आपलं शरीर आणि मन आपल्याला आणखी उत्तम साथ देईल, असा विचार कधी तुम्ही केलाय का ? दैनंदिन जीवनात स्वसंवादाचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे तुम्हाला कधी लक्षात आलंय का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर 'नाही' अशी असतील, तर स्व संवादाच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला अजुनही आला नाही! स्व संवादामध्ये काय ताकद आहे हे या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅ स्व-संवाद म्हणजे नेमकं काय ? ✅ स्व-संवाद कसा साधावा ? ✅ स्व-संवाद साधताना कोणती काळजी घ्यावी ? ✅ स्व-संवादाचे जीवनातील महत्त्व ✅ अयोग्य स्व-संवादाने काय होऊ शकतं ? |
Course 4 -
Emotional Intelligence रामायणामध्ये लक्ष्मणाला राग आणि त्याने शूर्पणखेचं नाक आणि कान कापून टाकलं. रावणाला राग आला आणि त्याने सीतेचं अपहरण केलं. पण रामाला राग येण्याची कोणतीच उदाहरणं आपल्याला रामायणामध्ये दिसत नाहीत. रामाला शबरीने उष्ठी बोर दिली होती त्याजागी जर दुसरा कोणी राजा असता तर त्याला या कृतीचा प्रचंड राग आला असता पण रामाला राग आला नाही कारण त्याने ती कृती न बघता त्यामागची शबरीची भावना बघितली.
कृती न बघता त्या व्यक्तीची भावना बघणं, ती समजून घेणं आणि त्यानुसार ऍक्शन किंवा रिऍक्शन देणं यालाच म्हणतात Emotional Intelligence. आपल्या करिअर मध्ये एका लेव्हल पर्यंतच आपण आपल्या Technical ज्ञानावर पुढे जाऊ शकतो, त्यापुढील लेव्हल ला आपण functional Intelligence वर पुढे जाऊ शकतो पण त्यापुढे जर जायचं असेल तर Emotional Excellence हे एकमेव महत्वाचं हत्यार आहे. जेव्हा आपण सिनिअर मॅनेजर किंवा मोठ्या पदावर जातो तेव्हा आपल्याला माणसं सांभाळायची असतात, माणसं हाताळायची असतात आणि माणसं हाताळणं म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणं त्यासोबत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, त्या समोरच्या पुढे योग्य शब्दात मांडणं. हा कोर्स याबद्दलच आहे. 👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? ✅Emotional Intelligence म्हणजे नेमकं काय? ✅Emotional Intelligence चे फायदे काय? ✅Emotional Intelligence आपल्या मध्ये Develop कसा करावा? ✅Emotional Intelligence आपल्या करिअर मधील प्रगतीसाठी कसा वापरावा? |
Special offer price !
|
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
TOOLs explained bySalil chaudhary |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |